मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्यामुळे राज्यातील मॉल्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र आता काही अटी घालून केंद्र सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने दुकानांना परवानगी दिली असली तरी मॉल्स मात्र उघडण्यास परवानगी दिलेली नाही.या निर्णयामुळे दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री हा आदेश जारी केला आहे.त्यानुसार सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.मात्र काम कामगारांना आणि ग्राहकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे.करोना विषाणूंचा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे आणि राज्य सरकारने ज्या ठिकाणी हॉटस्पॉट जाहीर केला आहे.अशा ठिकाणांची दुकाने मात्र येत्या ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.काल देण्यात आलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.मॉल्स आणि वाईनची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही.दुकाने आणि अस्थापना परवाना असणा-यांनाच दुकाने उघडता येणार आहेत.संबंधित दुकाने सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविण्यात आला आहे.राज्य सरकारांनी याला परवानगी दिल्यानंतरच ही दुकाने उघडता येणार आहेत.पालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीतील दुकाने येत्या ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.