बार,दारूची दुकाने,सलून बंदच राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने आज काही अटींवर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी दारूची विक्री करणारी दुकाने,शॉपिंग मॉल्स,शॉपिंग कॉम्प्लेक्स,सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद राहणार आहेत.कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने  उघडण्यास परवानगी दिलेली नाही,तर ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे,असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

आजपासून कोणती दुकाने सुरु होणार

  • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु राहतील
  • शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील
  • ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात
  • लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
  • दुकाने केवळ ५० टक्के कर्मच-यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.

  कोणती दुकाने बंदच राहणार

  • दारुची दुकाने बंदच राहतील
  • कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकाने देखील उघडण्यास परवानगी नाही
  • शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स  उघडणार नाहीत
  • सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थिम पार्क, थिएटर, बार बंद राहील.
  • सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद
  • महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
  • मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील
Previous articleव्यापारी संघटनेचे आवाहन : राज्य सरकारचे आदेश येईपर्यंत दुकाने उघडू नका
Next articleराज्यातील ८७ रेशन दुकानांचे निलंबन तर ४८ दुकानांचे परवाने रद्द