भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : विविध राज्यांमधील परप्रांतिय मजूरांना आपल्या गावी पाठविण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी योग्य आहे. आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. पण कोरोनाच्या या संकटांत जो महाराष्ट्रांतर्गत भूमिपूत्र जिल्हा-जिल्हा मध्ये अडकला आहे. जे कोणी स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण, वैदयकीय कारणांसाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत त्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसेची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी  विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला आहे.

 लॉकडाऊन मुळे आपला स्थानिक भूमिपूत्र जिल्ह्यामध्ये अडकला आहे, लॉकडाऊन मुळे जिल्हांतर्गत बंदी असल्यामुळे त्या भूमिपुत्रांना आपापल्या जिल्ह्यात जाता येत नाही ,त्यामुळे आज त्या भूमिपूत्रांचे कुटुंबिय चिंतेत आहे, मग या स्थानिक भूमिपुत्रांचा वाली कोण आहे. असा सवाल दरेकर यांनी केला आहे. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी तात्काळ व प्राधान्याने विशेष बस व्यवस्था करावी अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र बांधव व भगिंनींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाता यावे यासाठी राज्य सरकारने युध्द पातळीवर बसेसची व्यवस्था करुन एक विशेष अभियान राबवावे असेही दरेकर यांनी नमुद केले आहे.

Previous articleमंत्रिमंडळाचा पुनरुच्चार : मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर तातडीने नियुक्ती करावी
Next article५२२ नवीन कोरोना बाधित रुग्ण; राज्यातील रुग्णांची संख्या ८५९० वर पोहचली