मंत्रिमंडळाचा पुनरुच्चार : मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर तातडीने नियुक्ती करावी

मुंबई नगरी टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर  मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र त्यावर त्यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही.सध्या राज्यात कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे.कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी  तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर नियुक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मुख्यमंत्री ठाकरे हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने येत्या २८ मेपर्यंत त्यांना  दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल रोजी  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर  नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती मात्र त्यावर राज्यपालांनी  कोणताही निर्णय घेतला नसल्याने राज्यात सध्या असलेल्या संकटाच्या काळात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यात कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकार संकटाचा मुकाबला करत आहे.कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकी विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी  तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेल्या शिफारशीवर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous article१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार ?
Next articleभूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करा