मुंबई नगरी टीम
मुंबई : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परराज्यातील मजूरांच्या मदतीला धावून जाणा-या प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बसेससह त्यांच्या जेवणाची सोय करणारा अभिनेता सोनू सूद आपल्या सामाजिक कार्याने एका दिवसात खराखुरा स्टार मानला गेला. रूपेरी पडद्यावरील या हिरोने हतबल झालेल्या अनेक गरजुंना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आज सोनू सूद यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.कोरोनाच्या संकटात अभिनेता सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे.स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी त्याने बसेसची व्यवस्था केली होती.प्रवासात त्याने अशा मजूरांच्या जेवणाचीही सोय केली होती.एवढेच नाही तर त्याने केरळमध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या १७७ मुलींना बंगळुरुवरुन एका विशेष विमानाने या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.
या संकटात गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सूदने हेल्प लाईनही सुरू केली आहे.यावर येणारे फोन त्यांचे कुटुंब आणि मित्र याची सर्व माहिती गोळा करून या माध्यमातून ते गरजूंपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.लॉकडाउनमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशा अडचणीच्या काळात अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेता सोनू सूदची.शेवटचा मजूर त्याच्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही अशी जणू प्रतिज्ञाच सोनू सुदने केली आहे.त्याच्या या समाजसेवीची दखल घेत बिहारमधील सिवान येथे सोनूची चक्क मुर्ती तयार केली जाणार असल्याचे समजताच,माझ्या मुर्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांचा वापर गरीबांची मदत करण्यासाठी करा असे सुद याने आपल्या चाहत्यांना सांगितले.