संजय कुमार राज्याचे मुख्य सचिव; अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. अजोय मेहता हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.

Previous articleराज्यात कोरोनाचे ६२ हजार ३५४ ॲक्टीव्ह रुग्ण
Next articleहे आहेत विलासराव देशमुखांचे चिरंजीव “आमदार धीरजभैय्या”