खुशखबर : आता ग्राहकांना वीजबिल तीन समान हप्त्यात भरता येणार

मुंबई नगरी टीम

मुंबई:  तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे तीन समान हप्ते करून देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी घोषित केले. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी वीजबिल अधिक येण्यामागची कारणे व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सविस्तरपणे दिली.

वीज नियामक आयोगाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते.लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणने मिटर रीडींग व देयक वाटपाचे काम बंद ठेवल्याने एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.१ जून पासून शासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने महावितरणने ग्राहकांना मिटर रीडींगनुसार वीजदेयक देण्यासाठी १ जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने व शासनाने कोविड १९ संदर्भात वेळोवळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करुन मिटर रीडींग, वीजदेयके वाटप तसेच वीजदेयक संकलन केंद्रे पुन्हा सुरु केलेली आहेत.

जून महिन्यामध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसे. जाने. व फेब्रुवारी ) हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वर्क फ्रॉम होम व उन्हाळयामुळे मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे जी माहे जूनच्या बिलात दिसून येते आहे.जूनचे बिल कसे योग्य आहे हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्यअभियंता,अधिक्षक अभियंता यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी [email protected] व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावरून ग्राहकांच्या तक्रारींचे  निरसन त्वरित करण्यात येईल.

Previous articleग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधे वाटणार
Next articleपडळकर प्रकरणी देवेंद्र फडणवीस-चंद्रकात पाटलांची चौकशी करा