पंतप्रधान युध्दभूमीवर पोहचले,पण मुख्यमंत्री कोकणात देखील जाऊ शकले नाहीत !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारत- चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली.पंतप्रधानांच्या या भेटीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारत- चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण असून,आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोबलही वाढवले.पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह युध्दभूमीवर पोहचले,पण महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोकणात देखील नाही जाऊ शकले,असे दरेकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टीला मोठा तडाखा बसला होता.त्यामुळे कोकणासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबागचा दौरा केला होता.त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना मदत वाटपाचा दौरा रद्द करावा लागला होता.

निसर्ग वादळामुळे कोकणातील रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला न केल्याने  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दौ-याचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Previous articleपतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही,दिशाभूल केल्यास कारवाई करणार
Next articleपंकजा मुंडेंना राज्य कार्यकारिणीत स्थान नाही ; केंद्रात मोठी जबाबदारी देणार