खुशखबर : गणेशोत्सवासाठी गावाला जायचयं..मग चला आपल्या एसटीने

मुंबई नगरी टीम

मुंबई :राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्यास आता परवानगी देण्यात आली आहे.कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना नियमांचे  पालन करून एसटीने आपल्या गावी जाता येणार आहे.

कोरोनाच्या संकटात येणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावी जाण्याची ओढ कोकणी माणसाला लागली आहे. मात्र ग्रामिण भागात सध्या कोरोनाचा सुरू असणारा प्रदुर्भाव पाहता हे विघ्न दुर होईल का याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले होते.कोरोना अटोक्यात आला नसला तरी काही नियमांचे पालन करून कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी एसटीने आपल्या गावी जाता येणार आहे.अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वी राज्यातील ठाकरे सरकारने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे.गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करता येणार असल्याचे परब यांनी सांगितले. कोकणात गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होणार नाही,याची काळजी घ्यावी लागणार असल्याचेही परब यांनी सांगितले.

मुंबई आणि एमएमआर क्षेत्र आणि पुणे भागातील  चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाता यावे, यासाठी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत असेही परब यांनी  परब यांनी सांगितले.

Previous articleउद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही
Next articleमुख्यमंत्र्यांचा निर्धार : पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्ती योजनेचा लाभ