चंद्रकांतदादांची मोठी घोषणा : भाजप शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : गेली सहा महिने विरोधी पक्षाच्या भुमिकेत असणा-या भाजपने राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांतदादांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

काल मुंबईत झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हे वक्तव्य करीत असतानाच मात्र  शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.काल झालेल्या भाजपाच्याप्रदेश कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना केली होती.राज्यात सगळ्यात जास्त ताकद भाजपाची असून, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीने शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत.त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा मोठा वाटा आहे.अशा वेळी शिवसेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली असती तरी चालले असते. मात्र ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यासोबत त्यांनी सरकार स्थापन केले असे सांगतानाच,भविष्यात शिवसेना भाजप एकत्र आलो तरी निवडणुका मात्र वेगळ्या लढू असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्राकांतदादांनी यावेळी शिवसेनेवर टीकास्त्रही सोडले.शिवसेना सध्या खूप हवेत आहे.त्यांना अस  वाटतंय की स्वर्गाला बोटं टेकली आहेत. ते ऐकतील असे नाही,” असेही पाटील म्हणाले.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही.ते  राज्याचे हित पाहताना दिसत नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात असल्याचे आपण पाहत आहोत.हे सर्व पाहिल्यानंतर सरकार नीट चाललंय की नाही हे चौथीतला मुलगा किंवा मुलगी सुद्धा निबंध लिहिल,असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात युतीचे सरकार स्थापन करण्यास आम्ही तयार होतो.मात्र शिवसेनेने वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. निवडणुकीत भाजपचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आल्यानंतरही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे गैर होते. शिवसेनेने राज्याचा हिताचा विचार केला पाहिजे. स्वत:च्या हितासाठी अवाजवी मागू नये,वाजवी मागावं. त्यावेळी शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र शिवसेनेला ते मान्य नव्हते,असेही त्यांनी सांगितले.

Previous articleराज्यात आज ८७०६ रुग्ण बरे झाले तर ७९२४ नवीन रुग्ण आढळले
Next article…अन्यथा वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचा इशारा