दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार ; या संकेतस्थळांवर पहा निकाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यासह पालकांना प्रतिक्षा असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २९ जूलै रोजी म्हणजेच बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून सुमारे १७ लाखाहून हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. राज्यातील कोरोना संकटामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. गेल्याच आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने दहावी परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते.आज मंडळाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.त्याच दरम्यान राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने शेवटचा राहिलेला भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता.मात्र कोरोनाची परिस्थिती कायम राहिल्याने भूगोलचा पोपर रद्द् करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.कोरोना संकटामुळे पेपर तपासणीवर मोठा परिणाम झाला होता.त्यामुळे दहावी परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याचीच चर्चा होती.

उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सर्व विषय निहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होणार असून त्यासाठीची प्रत प्रिंट आउटच्या माध्यमातून घेता येणार आहे. तर www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांखिकीय माहिती मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालय यांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळाकडून अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणी साठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट जुलै तर छायाप्रतीसाठी १८ ऑगस्ट पर्यंत  http://verification.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर शाळा मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल या संकेतस्थळावर पाहता येणार

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल ?

 दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा

 त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

 त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

 Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. तुम्ही

निकालाची प्रिंट काढू शकता.तसेच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून 57766 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

Previous articleरोहा बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या !
Next articleमाथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय