९२ नगरपरिषदा, ४ नगरपंचायतीसाठी १८ ऑगस्टला निवडणूक : वाचा- निवडणूकीचा कार्यक्रम आणि कोणत्या नगरपरिषद,नगरपंचायतीची निवडणूक होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचतींसाठी येत्या १८ ऑगस्टला मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे.शिवाय ऐन पावसाळ्यात या निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्ष आणि कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.निवडणूक जाहीर झालेल्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी येत्या 18 ऑगस्टला मतदान होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला मतमोजणी होईल,अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा अजून कायम असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे.

वाचा : निवडणूक कार्यक्रम आणि कोणत्या शहरातील नगरपरिषद,नगरपंचायतीची निवडणूक होणार

Previous articleचिन्हाचे खेळ करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या ; उद्धव ठाकरेंचे आव्हान
Next articleधनुष्यबाण आणि पक्ष बळकावण्याचा मुख्यमंत्र्यांचा हेतू नाही : उदय सामंत