युपीचे पोलिस मुंबईत येवून गेले मग बिहारच्या पोलिसांना अशी वागणूक का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वाद चांगलाच रंगला आहे.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या पाटणा शहराच्या पोलिस अधीक्षक क्वारंटाईन केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्ला चढविला आहे. विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी युपीचे पोलिस येवून गेले मग बिहार पोलिसांना अशी वागणूक का दिली जात आहे.असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक सध्या मुंबई दौ-यावर असून,या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच,अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी क्वारंटाईन केल्यानंतर विरोधकांनी यावरून सरकारवर हल्ला चढविला आहे.माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.कोरोनाच्या संकटात केरळमधील वैद्यकीय पथकाने मुंबईला भेट दिली,युपी पोलिस विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत येवून गेले. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांची एक टीम आधीच ४ दिवसांपासून मुंबईत कार्यरत आहे पण त्यापैकी कुणालाही अडचणीत आणले गेले नाही तर फक्त एसपी दर्जाच्या अधिका-याशीच वेगळी वागणूक का दिली जाते ? असा सवाल फडणवीस यांनी ट्विट करून उपस्थित केला करीत बिहार पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावू न देता महाराष्ट्र सरकार अनावश्यक संशयाच्या भोव-यात का पडत आहे हे खरोखर खरोखरच विचित्र आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Previous articleआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे निधन
Next articleभाजपच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या “या” मागण्या !