माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

मुंबई नगरी टीम

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.ते ९१ वर्षांचे होते.नुकतेच ते कोरोनाच्या आजारातून बरे झाले होते.

काही दिवसापूर्वीच कोरोनावर मात केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यातील खासगी रूग्णालयात निधन झाले.त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.त्यांना काही दिवसांपासून किडनीचा आजार होता.१९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होते. तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता.माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Previous articleखूशखबर : महावितरण मध्ये ७ हजार जागांसाठी भरती होणार
Next articleआजपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार