राज्य सरकारने फडणवीस यांच्या काळातील अजून एक योजना केली बंद

मुंबई नगरी टीम

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना बंद करण्याचा सपाटा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लावला असतानाच फडणवीस यांच्या काळातील बळीराजा चेतना अभियान ही योजना बंद करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून फडणवीस सरकारच्या कार्यकालातील अनेक योजना बंद करण्याचा सपाटा सुरू असतानाच राज्य सरकारने फडणवीस सरकारने सुरू केलेली बळीराजा चेतना अभियान ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.महसूल व वन विभागाने आज त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या जिल्हयांकरीता विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्हयांची निवड करुन त्याअंतर्गत बळीराजा चेतना अभियान हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय फडणवीस सरकारने २४ जुलै, २०१५ रोजी घेतला होता.सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मागील ५ वर्षांचा आढावा घेण्यात आला असता, शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये घट दिसून आलेली नसून योजनेचा प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून आल्याने बळीराजा चेतना अभियान ही योजना रद्द करण्याचा विचार शासनाचा होता.त्यानुसार आज ही योजना बंद करण्यात आली आहे.

Previous articleरामभक्तांवर कारवाई करून सरकारने मोगलाईचे दर्शन घडविले
Next article‘सुसाईड नोट’ मध्ये नाव असणा-या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा