रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभिनव इन्स्टिट्यूटची अभिनव योजना

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिका व कमवा योजनेंतर्गत राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमधील नामांकीत इंडस्ट्रीजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या संस्थेने अभिनव योजना सुरू केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासमवेत ही शासनमान्य योजना राबवली जात असून त्यामुळे दहावी,बारावी, आयटीआय आणि पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कौशल्य भारत मिशन अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्य सरकारनेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या संस्थेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘शिका व कमवा’ ही शासनमान्य योजना राबवली आहे. संस्थेने राज्यातील जवळपास सर्वच जिल्हे आणि तालुक्यांमध्ये याची प्रवेश व मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत. १८ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थी तसेच बेरोजगार व्यक्तींना या संधीचा फायदा मिळणार आहे, असे अभिनव इन्स्टिट्यूटचे चेअरमन सुधीर दिक्षीत यांनी सांगितले.या माध्यमातून पदविका स्तरावरील अभ्यासक्रम राज्यभरात गरीब विद्यार्थ्यांना शिकत असताना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगधंदे आणि व्यवसायामध्ये सामावून घेता येणार आहे. या कालावधीत त्यांना विद्यावेतनही मिळणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी येणारा खर्च उपभोक्ता म्हणून उद्योजकांकडून केला जाणार आहे. यापूर्वीच व्यावसायिक, रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये सामावून घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, बोईसर, पालघर, नाशिक या परिसरात अनेक नामांकित इंडस्ट्रिजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हा रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व बेरोजगार व्यक्तींनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

 संपर्क क्रमांक : मो. ७४००१४८१२२/७४००१४८३४०

टेलि. नं. ०२२-४९६९०३२७,

 ई-मेल : [email protected]

वेबसाईट : www.abhinavinst.com बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रे कृपया ईमेलवर पाठवावीत.

पदविका स्तरावरील कोर्स

१. डिप्लोमा इन इशेन्शिअल स्किल (Diploma in Essential Skills)

२. डिप्लोमा इन बिजनेस स्किल (Diploma in Business Skills)

३. डिप्लोमा इन इंडस्ट्रियल स्किल (Diploma in Industrial Skills)

Previous articleगुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी
Next articleमोठा दिलासा : राज्यात एकाच दिवसात बरे झाले १० हजार ८५४ रुग्ण