अमित शहा यांनी राजीनामा द्यावा

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा
पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई, दि. ९ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा याच्या मुलावर कंपनी कर्जाच्या संशयास्पद व्यवहाराचे आरोप झाले आहेत. या आरोपांची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी करण्यात येवून या संपुर्ण व्यवहाराचे संबध निर्दोष सिध्द होत नाहीत तोपर्यंत अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

चव्हाण म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.चव्हाण म्हणाले, वायर वृत्तसंस्थेच्या वृत्तात कुठेही आरोप करण्यात आलेला नाही. जय शहा यांच्या वकीलांचे मतही बातमी मध्ये दिले आहे. जय शहा यांनी 2004 मध्ये टेंपल इंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जितेंद्र शहा यांच्यासोबत सुरू केली. 2004 ते 2006 मध्ये कंपनीचा काहीही कारभार झाला नाही. 2015-16 मध्ये मात्र कंपनीची उलाढाल 80 कोटी 50 लाख रुपयांवर पोहोचली. ही वाढ १६ हजार पट इतकी आहे. केआयएफएस या राजेश खांडवाला यांच्या कंपनीने जय शहा यांना 15 कोटीचे कर्ज कोणतेही तारण न घेता दिले. सेबीने या कंपनीला बंद का करू नये अशी नोटीसही बजावली होती. मात्र, जय शहा म्हणताहेत की हे कर्ज नव्हते तर डिपॉझिट होते. जय शहा यांची एक कुसूम किन्सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जुलै 2016 मधे स्थापन झाली. यामध्ये जय शहा यांचा 60 टक्के हिस्सा आहे. कंपनीला 2 कोटी 6 लाखांचे डिपॉझिट 2014-15 मध्ये मिळाले. तर 4 कोटी 90 लाखांचे कर्ज दुसऱ्या अनोळखी कंपनीकडून मिळाले असे चव्हाण यांनी सांगितले.
शहांनी रतलाममध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. हा 15 कोटी रूपयांचा प्रकल्प आहे. निरमा कंपनीशी संबधित बॅंकेने या प्रकल्पाला 25 कोटींचे कर्ज दिले. त्यापोटी कंपनीने फक्त 6 कोटी 20 लाखाचे तारण दिले आहे. यात अमित शहा यांची 5 कोटींची मालमत्ता तर यशपाल चुडासामा यांची 1 कोटी इतकी होती. चुडासामा यांच्यावर सोहराबुद्दीन एन्कांऊटर मध्ये सीबीआयने दबाव आणल्याचा खटला दाखल केला होता. या पवन ऊर्जा कंपनीला केंद्राच्या कंपनीने तत्कालीन मंत्री पियुष गोयल यांनी 10 कोटी 35 लाखांचे कर्ज दिले. यामधे स्पष्टपणे क्रोनिक कॅपिटलचा भाग आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहार झाले आहेत. चौकशी ईडी, सीबीआय, पीएमपीएल ने केली पाहिजे. यासगळ्या प्रकाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करायला हवा. यापूर्वी जैन हवालामध्ये अडवाणी, तहलका प्रकरणी बंगारू लक्ष्मण तर पूर्ती मध्ये नितीन गडकरी यांनी राजीनामे दिले होते. तिघेही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भाजप अध्यक्षांची अशी परंपरा असल्याचा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला. त्यामुळे अमित शहा यांनी देखील राजीनामा द्यावा. या व्यवहारांची संपूर्ण निपक्षपाती चौकशी व्हावी. अरूण जेटली यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, देशातील जनता सरकारकडे उत्तर मागत आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Previous articleसिंचन घोटाळ्याचा डाग लागलेले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे
Next articleखटुआ समितीचा अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here