वैफल्यग्रस्त झालेल्या काँग्रेसकडून बालीश आरोप


महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॅांग्रेसला प्रत्युत्तर
मुंबई दि. ९ पंचायत ते लोकसभा निवडणुकांमध्ये सतत पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त झाला असून निराशेपोटी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बालीश आरोप करत आहे, असा टोला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलावर काँग्रेस पक्षाने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले की, आज जाहिर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही भाजपाला जबरदस्त यश मिळाले आहे. त्यामुळे हताश झालेले काँग्रेसचे नेते बालीश आरोप करित आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय शाह यांच्या कंपनीला ८० कोटी नफा झाल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात जय शाह यांच्या कंपनीची उलाढाल ८० कोटी होती. असे स्पष्ट करतानाच चव्हाण हे अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलत असल्याचे पाटील यांनी सांगितले.जय शाह यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल केलेल्या प्रत्येक आरोपाचे सडेतोड उत्तर देऊन पाटील म्हणाले की, सत्तेमुळे अमित शाह यांच्या मुलाला कोणताही लाभ झालेला नाही. खोटी बातमी देऊन बेछूट आरोप करणाऱ्या वेबसाईटप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बदनामीचा दावा ठोकू. विनोद तावडे यांनी सांगितले की, जय शाह यांच्या कंपनीच्या बाबतीत काहीही चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी सच्चाईने व्यवहार केला आहे. अशा प्रकारे खोटे आरोप करून भारत काँग्रेसमुक्त करण्यापासून भाजपाला कोणीही रोखू शकत नाही.जय शाह यांचा व्यवसाय तोट्यात गेला तर त्यांना सत्तेचा कोणता सुवर्णस्पर्श लाभला, असा सवाल त्यांनी केला.

Previous articleखटुआ समितीचा अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द
Next articleमुख्यमंत्र्यांची तटकरेंच्या कार्यक्रमाला ऐनवेळी दांडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here