मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना लागण झालेले नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याठिकाणी सदस्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्तपदी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सरकारने आज १६ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.
नागपूर महानगरपालिचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर आज बदली करण्यात आली आहे. कोरेनाची लागण झाल्याने सध्या ते उपचार घेत आहेत.त्यामध्येच आज त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याठिकाणी सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी आयुक्त कैलास जाधव यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.एस.एस.जाधव यांची नियुक्ती सिडकोचे सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.तर डॅा.नरेश गिते यांची नियुक्ती महावितरणचे सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.अविनाश ढाकणे यांची नियुक्ती परिवहन आयुक्तपदी करण्यात आली आहे.तर शेखर चन्ने यांची राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.रामास्वामी यांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्त आणि संचालकपदी करण्यात आली आहे.
कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदी ए.बी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लोकेश चंद्र यांची नियुक्ती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हन करण्यात आली आहे.अंशु सिन्हा यांची नियुक्ती कौशल्य विकास व उद्योजकता विभागात सचिवपदी करण्यात आली आहे.दिपा मिसाळ यांची नियुक्ती जलस्वराज्य प्रकल्प नवी मुंबई येथे व्यवस्थापकपदी करण्यात आली आहे.तर एस.एम देशपांडे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. जल जीवन मिशनच्या संचालकपदी विमला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सी.के.डांगे यांची नियुक्ती भूजल सर्वेक्षण प्रधिकरणाचे संस्तेचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.रोहन घुगे यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकार म्हणून करण्यात आली आहे.