राज्याचे दिव्यांग धोरण दोन महिन्यात जाहीर करणार

राज्याचे दिव्यांग धोरण दोन महिन्यात जाहीर करणार
बडोले यांची माहिती
मुंबई, दि. १० दिव्यांग व्यक्तीसंबंधी चौदा विभागांचे अभिप्राय प्राप्त झालेले असून केंद्र सरकारप्रमाणे राज्याचे दिव्यांग धोरण येत्या दोन महिन्यात अंतिम करण्यात येईल. त्यानंतर जनतेच्या प्रतिक्रियेसाठी विभागाच्या संकेतस्थळावर सादर धोरणाची प्रत अपलोड करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीं यांच्या शिष्ठमंडळासोबत दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आज मंत्रालयात सविस्तर बैठक पार पडली.
यावेळी २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत बेघर झालेल्या ६२ दिव्यांगांसाठी एमएमआरडीएकडे सदनिकांची मागणी करण्यात येईल. तसेच मुंबईतील बंद पडलेल्या दिव्यांगांच्या टेलिफोन बुथवर सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानुसार इतर वस्तू विकण्याची परवानगी मिळावी यासाठीही मुंबई महानगर पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईत दिव्यांगासाठी वाटप झालेल्या मात्र आता कब्जेदार मयत असलेल्या दिव्यांगाचे स्टॉल इतर दिव्यांगांना लॉटरी पध्दतीने व्यवसायासाठी भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि आयुक्त अपंग कल्याण यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.म्हाडाच्या इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी चार टक्के सदनिका राखीव ठेवण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे यांनी स्पष्ट केले.

Previous articleसाहित्य संस्थांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here