दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार

  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार
मुंबई, दि. 10  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 56 लाख 59  हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकांकडील सुमारे 36 लाख कर्ज खात्यांची आणि  व्यापारी बँकांकडील 30  लाख कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन माहिती  माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करण्याचे काम प्रगती पथावर असून  दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरूवात करावी अशा सूचना  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत  संबंधितांना देण्यात आल्या.
अमंलबजावणीचा भाग म्हणून ज्या गावांमध्ये ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे अशा गावांमध्ये चावडी वाचनाद्वारे आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील निकषानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी  ‘आपलं सरकार’पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  पात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर बॅंकांमार्फत  शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील रक्कमा निरंक करून योजनेचा  लाभ देण्यात येईल.
त्यावेळी या समितीचे अध्यक्ष तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत  पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू , माहिती तंत्रज्ञान  विभागाचे संचालक  मुथू कृष्णन शंकरनारायणन व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे व संबंधित वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
Previous articleयवतमाळ दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी
Next articleगुजराती साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here