यवतमाळ दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी

मुंबई  दि.10   यवतमाळ येथील कीटकनाशक फवारणी दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
यवतमाळ येथील किटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या दुर्घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. याप्रकरणी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी प्राथमिक चौकशी केली. हा चौकशी अहवाल राज्य सरकारला नुकताच मिळाला आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी कायदा बनवण्याचा विचार केला जाईल. ज्या कंपन्यांनी औषधाचे चुकीचे मिश्रण बनवले अशा कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांनी अशा विषारी खताची विक्री केली त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. त्यानुसार कायदेशीर तरतूद करण्याचा विचार आहे. चायनीज गनच्या वापरामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या गनवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Previous article
Next articleदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here