उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.याची माहिती खुद्द पवार यांनी दिली आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले आहे.

थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या काही दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. त्यांची कोरोना चाचणी  निगेटिव्ह आली होती. त्यांना त्रास जाणवत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Previous articleहिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा ;उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान
Next articleआरपीआयचा झेंडा हाती घेत अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री