मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज प्रशासनात मोठे फेरबदल करीत तब्बल १२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.वल्सा नायर यांची प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात पर्यटन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज १२ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,विशेष चौकशी अधिकारी,सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांची मंत्रालयात पर्यटन विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त ( करमणूक) यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. बगाटे यांची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारीपदी करण्यात आली आहे.तर एस.एल पाटील यांची महानंदामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे महसूल उपायुक्त डि.व्ही स्वामी यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ए.आर. चव्हाण यांची नवी मुंबई येथे जलस्वराज्य प्रकल्प येथे प्रकल्प अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.के. तावडे यांची नियुक्ती शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.के. द्विवेदी यांची पुणे येथे महानगरप्रदेशाचे अतिरिक्त आयुक्त ( पीएमआरडीए) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.ए. तेलंग यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पणन मंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.ए. टकसाळे यांची नियुक्ती नागपूर येथे आदिवासी विकासचे अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.पी.पुरी यांची नेमणूक सह सचिव म्हणून मुंबईत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात करण्यात आली आहे.सी.डी.जोशी यांची महाराष्ट्र राज्य सामान्य परीक्षा विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.