मी ज्या म्हशीचा अपमान करण्याची हिम्मत केली त्याला चद्रकांत पाटलांचा पाठिंबा ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : अमृता फडणवीस यांचे ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आहे.या गाण्यावर दिग्दर्शक महेश टिळेवर यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत टिळेकर यांचे फोटो समाज माध्यमाच व्हायरल झाल्यावर पुन्हा एकदा टिळेकर यांनी फेसबुकवर पोस्ट करीत हल्ला चढविला आहे.

टिळेकर यांच्या टीकेनंतर समाज माध्यमात टिळेकर यांच्यासोबतचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत.यावर आज टिळेकर यांनी एका कार्यक्रमातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटे शेअर करीत याला उत्तर दिले आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की,शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई यांच्या बरोबरचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली की,ज्या भक्तांच्या लाडक्या गायिकेचा मी समाचार घेतला आणि तो प्रसिद्धीसाठी हपापलेला नट आरोह त्याला त्याची लायकी दाखवली,या सगळ्या मागे पवार कुटुंबाचा हात आहे.पण या फोटोत भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहे हातात हात देताना.म्हणजे मी जे काही पुढं येऊन म्हशीचा अपमान करण्याची हिम्मत केली त्या मागे चद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ निघू शकतो..राजकारण आहे हे. काट्याने काटा काढायचो असतो आणि या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या कडून मला करोडो रुपये मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही..आता काय म्हणाल भक्तांनो ? असा सवाल टिळेकर यांनी केला आहे.

नेमका काय आहे हा वाद ?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही” असे म्हणत अमृत फडणवीस यांना खरंच गाता येते का ? असा सवाल महेश टिळेकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला होता.

टिळेकर यांची फेसबुक पोस्ट……

“हिला नको गाऊ द्या”..चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी ,नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडेआणि जर ह्या गायिके कडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी.
पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा
महेश टिळेकर

Previous article“गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय” ?…. अजित पवार
Next articleएसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा डाव