मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज वरिष्ठ सात सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,सामान्य प्रशासन विभागातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रा यांची नियुक्ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येथे प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली आहे
डॉ.एच.मोडक यांची नेमणूक सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप सचिव म्हणून तर डॉ.संदिप राठोड यांची नियुक्ती हाफकिन मध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर करण्यात आली आहे.एस.एल.अहिरे यांची नेमणूक सहाय्यक सचिव म्हणून महिला व बालविकास विभागात करण्यात आली आहे.महाराष्ट्र बियाणे महामंडळ अकोला व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती विक्री कर सह आयुक्त म्हणून ( रिव्हालूशन) करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव सुशिल खोडवेकर यांची नियुक्ती कृषी आणि एडीएफ विभागाचे उपसचिव म्हणून करण्यात आली आहे.तर जिल्हा जात छाननी समितीचे अध्यक्ष बी.बी.दनगाडे यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येथे करण्यात आली आहे.