बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये तर दहावीच्या परीक्षा मे महिन्यात होणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता असून,कोरोना प्रादुर्भावामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या १२ वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याबाबत सरकार विचार करीत असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी हा विचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत होणाऱ्या १२ वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर सरकार विचार करत आहे.दहावीची परीक्षा मार्चमध्ये असते आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असते.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने राज्यातील शाळा देखील सुरु होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरील विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर आणणे आणि २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यावर विचार सुरु आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा हाच यामागे उद्देश आहे असेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना संकटात विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी हा विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleठाकरे सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी; मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पसंती
Next articleअभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार