मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड ? नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याच्या सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर प्रहार केला आहे.कोरोनाच्या काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यु झाले.याला संपूर्ण जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

शिवसेना आज आपला ५५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने महाविकास आघाडी सरकार मधिल मंत्री आणि नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसैनिकांवर शुभेच्छांचा वर्षावर केला असतानाच शिवसेनेचे एकेकाळचे नेते माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली,त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यु दिले.याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत.दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स,वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू., मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड ? असा सवाल राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

Previous articleसंघर्ष चालू ठेवायचा असेल तर…. चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
Next articleमुंबई पुण्यासह १० महापालिका,नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणूका फेब्रुवारीत ?