मुंबई पुण्यासह १० महापालिका,नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणूका फेब्रुवारीत ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई पुण्यासह राज्यातील १० महानगरपालिका,२० नगरपरिषदा तसेच नगरपालिकांच्या निवडणूका या नियोजित वेळेत म्हणजेच फेब्रुवारीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून,नवी मुंबई,औरंगाबाद,कोल्हापूर,वसई विरार या महानगरपालिकांसह ६५ नगरपालिका,नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रलंबित निवडणूका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली असल्याचे समजते. मात्र भविष्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्यातील काही महानगरपालिका तसेच नगरपालिका,नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.येत्या काही महिन्यात मुंबई,पुणे,पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १० महानगरपालिका तसेच २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांची मुदत संपत असल्याने कोरोनामुळे याही निवडणूका पुढे ढकलल्या जाणार का अशी चर्चा असतानाच आता या महानगरपालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.तसेच मुंबई,पुण्यासह १० महानगरपालिका,२० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.तर नवी मुंबई,औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह ६५ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रलंबित निवडणूका या येत्या  ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबाद,नवी मुंबई,वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणूका गेल्या वर्षापासून प्रलंबित असून,पुढील निवडणूका या एकसदस्यीस प्रभाग रचना पद्धतीने होणार असल्याचे समजते. महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा.तर राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपाची संघटनात्मक रचना बळकट आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड ? नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Next articleदेशातील तरूण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो !: नाना पटोले