दीपक केसरकर तुमची लायकी काय आहे आम्हाला चांगले माहित आहे : राणेंचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । नारायण राणे यांची मुलं अजून लहान आहेत त्यांना ट्विट करण्याची आवड आहे, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांवर हल्लाबोल केला होता.केसरकरांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकर यांना प्रत्युत्तर देत दीपक केसरकर तुम्हीची लायकी काय आहे हे आम्हाला चांगले माहित आहे.तुमच्या मतदार संघात काय अवस्था आहे ? तुम्हाल कुबड्या मिळाल्या आहेत त्यावर चाला.नाही तर मतदार संघात तुमचा कार्यक्रम आटोपला होता असा गंभीर इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे यांची मुलं अजून लहान आहेत. त्यांना ट्विट करण्याची आवड आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीका केली होती.केसरकर यांच्या या टीकेला राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज ट्विटरवर व्हीडीओ शेअर करून प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे.सध्या आपण युती मध्ये आहोत.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात.युती टिकवायची जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढीच तुमची सुद्धा आहे.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाही हे विसरू नका असा इशारा राणे यांनी देवून, तुमच्या मतदार संघात आम्ही काय अवस्था केली आहे हे चांगलेच माहित आहे.राणेंच्या ह्याच दोन्ही मुलांनी नगरपालिका तुमच्याकडून घेतली.जिल्हा परिषद,ग्रामपंचायत आमच्याकडे आहे असे सांगून केसरकर तुमची लायकी काय आहे हे आम्हाला माहित आहे असा टोला राणे यांनी केसरकरांना लगावला आहे. केसरकरांची मतदार संघात काय अवस्था आहे.त्यामुळे उगाच कशाला उड्या मारता असेही राणे यांनी सुनावले आहे.तुम्हाला कुबड्या मिळाल्या असल्याने त्यावर चाला नाही तर मतदारसंघात तुमचा कार्यक्रम आटोपलाच होता असेही त्यांनी केसरकरांना ठणकावले.तुम्हाला राजकीय जिवदान मिळाले आहे हे विसरू नका, इज्जत मिळतेय ती घ्यायला शिका असे सुनावतानाच तुम्ही ज्या भाषेत सांगाल त्याच भाषेत उत्तर मिळेल असा इशाराही राणे यांनी दिला.वातावरण खराब करू नका, जबाबदारी आपल्या दोघांवर आहे हे विसरू नका,आपण युतीत आहोत.तुम्ही नविन असल्याने तोंड उघडण्यापुर्वी काय बोलायचे ते विचार करून बोला असे खडेबोलही राणे यांनी केसरकरांना सुनावले आहेत.

Previous articleशिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले असताना सेनेनी घेतलेली भूमिका अनाकलनीय : काँग्रेसची नाराजी
Next articleशिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा हात : दिपक केसरकरांचा गंभीर आरोप