राजकीय अभिनिवेशातून काही राजकीय पक्षांचे शेतक-यांच्या नावाखाली आंदोलन

मुंबई नगरी टीम

वसई : केंद्र सरकारच्या शेतकरी कायदयाला विरोधी करण्यासाठी आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. पण पंजाब, हरियाणा अशी एक दोन राज्य सोडले तर काही निवडक लोक हे आंदोलन चालवित आहेत. देशातील बहुतांश शेतक-यांच्या या आंदोलनाला पाठिंबा नाही,कारण केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो शेतक-यांच्या हिताचा आहे,सुरक्षेचा आहे, शेतक-यांचा माल विकून त्यांना आर्थिकदृष्ट्या बलवान करणारा आहे. जर शेतकरी बलवान झाला तर मोदी सरकारची योजना यशस्वी होईल व आपली राजकीय दुकानदारी कशी चालणार या राजकीय अभिनिवेशातून काही राजकीय पक्षांचे शेतक-यांच्या नावाखाली आंदोलन सुरु असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

धडक कामगार युनियन जनसंपर्क कार्यालयाच्या वसई पश्चिम मधील शास्त्रीनगर येथील कार्यालयाचे उद्घाटन आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्त झाले.त्यावेळी दरेकर बोलत होते.मोदी सरकारला स्वतःसाठी काही करायचे नाही.मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी काम करायचे आहे. कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी सगळ्या राज्याला पत्र दिली कि अश्या पद्धतीने कायदा केला पाहिजे आता ते पत्र माध्यमाच्याद्वारे बाहेर येत आहे. वस्तुस्थिती बाहेर येत आहे. काँग्रेसच्या वचननामा मध्ये एपीएमसी निरस्थ केल्या पाहिजेत असे वचन दिले होते. व तसे राहुल गांधीनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे आता दुसरा काही मुद्दा केंद्र सरकार किंवा मोदी सरकार विरुध्द बोलण्यासारखा नाही, म्हणूनच या आंदोलनाच्या मागून मोदी सरकारवर मागून वार करण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करत आहे,असा आरोपही दरेकर यांनी केला.

गेल्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारच्या वृत्तपत्रात जाहिराती पहिल्या महाराष्ट्र थांबणार नाही.. थांबले नाही… परंतु वस्तुस्थिती अशी आहे हे सरकार महाराष्ट्राला थांबवण्याचं प्रयत्न करत आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.युनियन क्षेत्रामध्ये ज्या धडकेने ते काम करतात आणि कामगारांचं हित जपत असताना व्यवस्थापन आणि कामगार युनिअन यांच्या मध्ये नीट समन्वय ठेवत आज एक आघाडीची कामगार संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे सांगतानाच दरेकर म्हणाले की,कामगार हा समाजातला महत्वाचा घटक आहे जो काबाड कष्ट करतो,राबतो,मेहनत घेतो. म्हणून तो कामगार जगला पाहिजे तो कामगार टिकला पाहिजे,त्या कामगारच कोणी शोषण करता कामा नये अशा भूमिकेतून खऱ्या अर्थाने युनियनचे काम सुरु असते असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये अनेक युनियन झाल्या. कधीकाळी त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले, पण कधीकाळी नेतृत्वाच्या हव्यासा पोटी लोकांना देशधोडीला लावायचं सुद्धा काम या युनियन आणि नेत्यांनी केल्याचं राज्यामध्ये पाहिलं आहे.आज देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामगार अस्वस्थ आहे. कामगारांवर अन्याय होत आहेत व या परिस्थितीमध्ये कामगारांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. आज कामगारांचे हित जपणारी युनियन आज चिमाजी अप्पांच्या पुण्यनगरीमध्ये स्थापन झाल्याचे सांगतांना दरकेर म्हणाले की, सामाजिक काम आणि युनियनचे काम करणे यामध्ये फरक आहे असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

Previous articleअरुण लाड यांच्यासह ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
Next articleमोठी बातमी : राज्यात ६ हजार शिक्षकांची पदे भरणार