बारामतीत एखाद्यावेळी सुर्य पश्चिमेकडे उगवेल मात्र बारामती शरद पवारांना सोडणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गड आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा असलेला बारामती लोकसभा मतदार संघ काबीज करण्याची तयारी भाजपने केली आहे.तर बारामती लोकसभा मतदार संगातून भाजपाचा उमेदवार मोठ्या मत्ताधिक्क्याने विजयी होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असतानाच राष्ट्रवादीने भाजपला प्रत्युत्तर देत,बारामतीत एखाद्यावेळी सुर्य पश्चिमेकडे उगवेल मात्र बारामती शरद पवारांना सोडणार नाही असे मोठे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचा भक्कम मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा करून विविध ठिकाणी मेळावे घेवून बारामती लोकसभा मतदार संघ काबीज करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.आगामी लोकसभा निवडमुकीत बारामती मदार संघातून भाजपचा उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे.बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेतला आहे.एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार यांच्या बारामतीत भाजपला होत आहे असा टोला पाटील यांनी लगावला आहे.बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच.बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवार यांना सोडणार नाही एवढे ते घट्ट नाते आहे असेही पाटील म्हणाले.

बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल.बारामती सध्या भाजपने लक्ष केले आहे शिवाय आमच्याकडेही लक्ष केले आहे. असे वातावरण तयार करायचे की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना लक्ष करत आहोत अशी भाजपची माध्यमांसमोर जाण्याच्या पध्दत आहे. मात्र थोड्या दिवसात आमचीही रणनिती मांडणार आहे.त्यावेळी कुणाकुणाला लक्ष करत आहोत हे लक्षात येईल असा इशाराही पाटील यांनी दिला.सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे हे लक्षात यायला लागले आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते असा हल्लाबोलही पाटील यांनी केला.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी का नाकारली.ती का नाकारली याची चर्चा करु इच्छित नाही परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणे त्यांना शोभत नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Previous articleएकनाथ शिंदे शिवसेनेला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत;खासदार,आमदार,नगरसेवक शिंदे गटात ?
Next articleसरन्यायाधीशांनी केलेल्या प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला