मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात.पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत.राज्यपाल गोव्याला निघून गेले आहेत.राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे.पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.अशा शब्दात शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागांतून शेतकरी आज मुंबईत दाखल झाले.आझाद मैदानात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतक-यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.आझाद मैदानावरील आंदोलनानंतर शेतक-यांचे शिष्टमंडळ राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देणार होते.मात्र शरद पवार यांनी राज्यपाल मुंबईत नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.”तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात.पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत.राज्यपाल गोव्याला निघून गेलेत.राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे.पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती.राज्यातला कष्टकरी,अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरे येणे अपेक्षित होते. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही.निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं अशा शब्दात पवार यांनी त्यांचा समाचार घेतला.
ही लढाई सोपी नाही.ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही.गेले ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत.देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का,असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.शरद पवार यांनी उपस्थिती लावत आपला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच शरद पवारांनी मोदी सरकारला त्यांच्या भुमिकेवरून खडेबोल सुनावले.
गेले ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का ?,असा सवाल शरद पवार यांनी केला. दिल्लीत आंदोलन करणारा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणातील आहे. पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. पंजाबचा शेतकरी हा काय साधा शेतकरी आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी स्वांतत्र्य लढयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. चीन-पाकिस्तानविरोधात युद्ध लढले आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यातही पंजाबच्या शेतकऱ्यांनी प्राण पणाला लावले. अर्ध्या देशाला अन्न पुरवणारा हा बळीराजा आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत असल्याची टीका पवारांनी केली.
…तर त्याला जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही
चर्चा न करता कायदे आणले गेले. संसदेत कायदा आणला आणि एका दिवसात अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य झाले. या कायद्यांची चर्चा आम्हला करायची आहे, असे विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगितले. सविस्तर चर्चा केली पाहिजे. पण केंद्राने कोणतीही चर्चा केली नाही, असेही पवारांनी सांगितले. आधी कायदा रद्द करा आणि मग चर्चा करा. आमचीही चर्चेची तयारी आहे. पंरतु शेतकऱ्यांचे हमी भावाशी संबंधित जे प्रश्न आहे, त्यात कोणतीही तोडजोड केली जाणार नाही. जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पाहिला नाही
मोर्चानंतर राज्यपालांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे मला सांगितले. पण मी महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाहीत, अशी टीका शरद पवारांनी केली. शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे हे माहित असूनही राज्यपाल गोव्याला गेले. त्यांनी थांबायला हवे होते. या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे हे निवेदन आता कुठे द्यायचे याचा विचार करूया. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. पण तेवढे धैर्य त्यांनी दाखवले नाही, अशा शब्दांत पवारांनी राज्यपालांना सुनावले.