प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्याला नाराज करुन चालणार नाही

मुंबई नगरी टीम

भंडारा : पवारसाहेबांच्या नावाची मोहीनी महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कर्तृत्वाने… नेतृत्वाने कार्यकर्ते जोडले आहेत त्या कार्यकर्त्यांशी… जो कार्यकर्ता कधी पुढे येत नाही… जो कार्यकर्ता निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतो त्या कार्यकर्त्याला नाराज करुन चालणार नाही म्हणून राष्ट्रवादी परिवारातील या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुमसर – मोहाडी विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत दिली.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत आहे. मतदारसंघातील प्रश्नांची उकल होत आहे. कार्यकारिणीतील अडथळे समजत आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस या समस्यांवर मात कळण्यासाठी तोडगा काढेल असा विश्वास जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने या दौऱ्याची घोषणा केली आणि विरोधकांचे कान टवकारले निवडणूका आल्या की काय असं वाटू लागले आहे मात्र आमचा हा दौरा आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी… आमचा पक्ष मोठा करण्यासाठी आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे युवक,युवती हे राष्ट्रवादीचे भवितव्य आहेत. ते अत्यंत जिद्दीने काम करत आहेत. त्यातील अनेकजण उच्चशिक्षित आहेत. त्यांचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे हे पाहून मला खुप समाधान वाटते आहे असेही पाटील म्हणाले.या भागातील पक्षसंघटन प्रश्न सोडविण्यासाठी हवेच तरच प्रभावीपणे प्रश्न सोडवता येतील. बुथ कमिटया हा आपल्या पक्षाचा बेस आहे. या कमिटया नसतील तर तयार करा अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

Previous articleलोकांचा अंत पाहू नका; मराठा आरक्षणावरून दोन्ही राजेंची सरकारवर तोफ
Next articleकाँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हणाले !