आरोग्य विभागातील मेगाभरतीची घोषणा; ‘या’ पदांसाठी २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

मुंबई नगरी टीम

  • २८ फेब्रुवारीला परीक्षा घेतल्या जाणार आहेत
  • मार्चला ही भरती प्रक्रिया राबवली जाणार
  • विविध पदांसाठी भरती होणार

औरंगाबाद । आरोग्य विभागात ५० टक्के जागा भरणार असल्याची मोठी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये केली आहे. २८ फेब्रुवारीला परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार मार्चला ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सध्या आरोग्य विभागात एकूण १७ हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहेत. तर सुरुवातीला ५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
‘या’ पदांसाठी भरती होणार

सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट,ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स -रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर , रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.

Previous articleखळबळजनक ! पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कॅबिनेटमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Next articleटिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले ?