शिक्षणमंत्र्यांची घोषणा : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील महिन्यात होणा-या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता मात्र राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील मुद्दा भाजपचे सदस्य सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की,दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे.त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Previous article५ वर्षात १५ हजार हिंदू मतदार कमी तर १२ हजार मुस्लीम मतदार वाढले !
Next articleगुड न्यूज : दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार