मुंबई नगरी टीम
मुंबई । सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली असून,ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
पोलिस दलात होणाऱ्या बदली संदर्भात संजय पांडे हे नाराज आहेत.त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद मिळाले नाही.आज दस्तुरखुद्द आयपीएस अधिकारी संजय पांडे अगदी उद्विकतेने सांगतो माझ्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारची भूमिका आयपीएस अधीकारी पत्राद्वारे करत असेल यापेक्षा गंभीर काहीच असु शकत नाही,असे दरेकर यांनी सांगितले.
मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्या नतंर हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलले की पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असुन पुनः गतवैभवाचे दिवस आणायचे आहेत.पोलिसांनी गुन्हेगारी करता कामा नये.या संदर्भात दरेकर म्हणाले की, राज्य सरकारला गृहखातं सांभाळण्यात अपयश आले आहे. पोलीस खात्यात कोणाचा कोणाला मेळ नाही, नियंत्रण नाही आणि त्यातून अशा प्रकारचे वाझे तयार होतात आणि उद्वीगतेने संजय पाटील यांची प्रतिक्रिया येते. गृहखात्यांचा व कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर कॉरंटाईन सेंटर पासून हॉस्पिटल मध्ये बलात्कार,विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. खून,दरोडे होत आहे. वाझे सारखा खाकी वर्दी माणूस अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकारमध्ये कोणतेही नियंत्रण नसुन पोलिस दलाची बदनामी झाली असून याला राज्य सरकार जबाबदार आहे असे दरेकर यांनी सांगितले.