राज्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन ? मुख्यमंत्री ठाकरेंनी केले ‘हे’ मोठे विधान

मुंबई नगरी टीम

नंदुरबार । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल का ? अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.राज्यातील रूग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊन करणे हा एकच पर्याय समोर दिसत आहे मात्र ते लगेचच करणार नाही.आता लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे असे सांगतानात, लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे’, अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना वजा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.काल तर सर्वांधिक रूग्णांची नोंदली गेली आजही राज्यात २५ हजार ६८१ रूग्णांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितल्यानंतर आज नंदुरबार मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.राज्यातील रूग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊन करणे हा एकच पर्याय समोर दिसत आहे मात्र ते लगेचच करणार नाही.आता लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे असे सांगतानात, लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.परदेशात आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन आपल्याकडे आला आहे मात्र त्याचे आकडे नियंत्रणात आणण्यात यश आले होते. त्यामुळे आता ज्या वेगाने कोरोना पसरत आहे त्याचे नेमके कारण काय, हा नवा विषाणू आहे का, याचा शोध घेतला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, कोरोना संसंर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य राखण्यात यावे.तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल. विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटन मंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारिरीक अंतर राखण्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. दुर्गम भागातील माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखण्याचे पालन करणे सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला.ठाकरे यांनी लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शितपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.ठाकरे यांनी पोषण पुर्नवसन केंद्राला भेट देऊन कुपोषीत बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.

Previous articleठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला : प्रविण दरेकरांची टीका
Next articleकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय