गोळीबारातून राष्ट्रवादीचे आ.अण्णा बनसोडे बचावले; बनसोडे म्हणाले, “मी सुखरुप”

मुंबई नगरी टीम

पुणे । पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटना आज घडली आहे.या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून,या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.तर आज जो काही प्रकार घडला आहे त्यामध्ये मला किंवा अन्य कोणालाही काही झालेले नसून,मी सुखरुप आहे.तरी आपण संतप्त न होता कुठेही गर्दी करु नका व पुढील तपास पोलिसांच्या स्वाधिन केले असून त्याचा सोक्षमोक्ष ते करतील. कृपया आपण शांतता बाळगा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन आ.बनसोडे यांनी केले आहे.

चिंचवड स्टेशन नजीक राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय असून, त्याच परिसरात आज बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तान्हाजी पवार या व्यक्तीने पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळी झाडली.या गोळीबारात आ. बनसोडे हे सुदैवाने बचावले असून,या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपी तान्हाजी पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.गोळीबाराचे नेमकं कारण समजले नाही.मात्र माझ्या सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना कळवतो की, आज जो काही प्रकार घडला आहे त्यामध्ये मला किंवा अन्य कोणालाही काही झालेले नसून मी सुखरुप आहे. तरी आपण संतप्त न होता कुठेही गर्दी करु नका व पुढील तपास पोलिसांच्या स्वाधिन केले असून त्याचा सोक्षमोक्ष ते करतील. कृपया आपण शांतता बाळगा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन आ. बनसोडे यांनी केले आहे.

या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना आ.बनसोडे म्हणाले की,अॅन्थेनी नावाचा एक कंत्राटदार आहे. मी त्याला ओळखत नाही. तीन साडेतीन वर्षांपासून तो आमच्याकडे काम करत आहे.त्याच्याकडे तान्हाजी पवार म्हणून एक सुपरवायझर आहे. त्याला माझ्या स्वीय सहायकाने फोन करून दोन मुलांना कामावर घे असे सांगितले होते. त्यावेळी त्याने अरेरावी केली होती.या घटनेनंतर तो आज सकाळी कार्यालयाजवळ आला होता. त्याच्याशी माझे बोलणेही झाले.यानंतर मी त्याला हा विषय सोडून द्यायला सांगितले.याबाबत मी त्याच्या मालकालाशीही याबद्दल बोललो.मात्र तो कार्यालयाच्या बाहेर आला आणि त्याने गोळीबार केला.कार्यालयात येताना तो याची तयारी करुन आला असावा,त्याच्या सोबत त्याचा मेहुणा होता. त्यांच्याकडेही पिस्तुल होते,असे आ. बनसोडे यांनी सांगितले.त्याने यावेळी वाद घातला.या प्रकारानंतर कार्यकर्ते आणि त्यांच्यात शिवीगाळ झाली.त्याने गोळीबार केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला खाली पाडले आणि मारहाण केली.त्या दरम्यान त्याने दोन फैरी झाडल्या होत्या.त्यातली पहिली गोळी माझ्या दिशेने झाडली. पण, एका कार्यकर्त्याने त्याला धक्का मारल्याने ती दुसऱ्या दिशेला गेली.

Previous articleरिक्षा चालकांनो..१५०० रूपयांच्या अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही
Next articleबापरे ! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियावर होणार ६ कोटींची उधळपट्टी