मुंबई नगरी टीम
मुंबई । परळीत गेलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडी मध्ये पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत असून,एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या प्रकरणी कुठल्याही दबावाविना चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.तर काय चाललंय महाराष्ट्रात ? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते,चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
परळीला आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा यांना अंबेजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आता या प्रकरणावरून भाजपने निशाणा साधला आहे.करुणा शर्मांची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात ? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते,चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते, असा सावल माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करीत केला आहे.तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडले त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जात आहे,हे स्पष्ट होत आहे. पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ,त्यानंतर मिळालेली पिस्तूव हा प्रकार गंभीर असून,कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी,अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
अपने को तो रायता फैलाना है, अपने को तो पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
पत्रकार परिषद घेऊन हंगामा करण्याचा हेतू घेऊन परळीला आलेल्या करुणा शर्मा यांची एका व्यक्तीशी बोलतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, यात करुणा शर्माला समोरचा व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, याबाबत ऍड सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसचा उल्लेख करून सांगतोय व त्यामुळे सांभाळून बोला असा सल्ला देतोय. तर त्यावर करुणा शर्मा म्हणतात, ‘ये तो बहुत अच्छा हुआ, इसमे तो फायदा है अपना, मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दुंगी। अपने को क्या रायता फैलाना है, अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे असे म्हणताना ऐकायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून करुणा शर्मा व त्यांचे साथीदार हे सगळं केवळ ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच करत आहेत हे या व्हायरल ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होत आहे. व आज परळीत येण्याचा त्यांचा उद्देशही हाच होता हेही या व्हाईस क्लीप वरून लक्षात येत आहे.