मुंबई वगळता महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिका व नगरपरिषदा,नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे महानगरपालिका निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल.नगरपालिका आणि नगरपरिषदेत २ सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतीमध्ये १ सदस्यीय पद्धत असेल.

राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा,नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल. यापूर्वी राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती.मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार,महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य,परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत १ सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल.नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र २ सदस्यीय,तर नगरपंचायतीला १ सदस्यीय प्रभाग असणार आहे.आजच्या बैठकीत चार सदस्यीय प्रभागाचा प्रस्ताव होता मात्र ३ सदस्यीय प्रभाग योग्य ठरेल असे मत काही मंत्र्यांनी मांडले त्यानुसार ३ सदस्यी प्रभाग निश्चित करण्यात आला.नगरपरिषद आणि नगरपालिकेत २,तर नगर पंचायतीमध्ये १ प्रभाग पद्धत असेल.अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

Previous articleमंत्रिमंडळ बैठक : ठाकरे सरकारने घेतले महत्वाचे ११ निर्णय
Next articleठाकरे सरकारने घेतलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध