मुंबई नगरी टीम
रत्नागिरी । समाजकारण किंवा राजकारण करत असताना आजपर्यंत अनेक उदाहरणे जगाने पाहिली आहेत की,जे सामान्य कार्यकर्ते पुढे मोठे नेते झाले आणि आपण सामान्य कार्यकर्ता होतो हे विसरले. परंतु अपवादात्मक काही नेते हे मोठे नेते झाले तरी स्वतःला अजून सर्वसामान्य कार्यकर्ताच समजतात,त्यांचे अनेकवेळा उदाहरण देता येईल,असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदूर्ग पालकमंत्री उदय सामंत यांची कोकणात आणि राज्यात “माझा उदय” म्हणून ओळख आहे.त्यांच्या या स्वभावाचा आज त्यांच्या पालीवासियांनी पुन्हा एकदा आला.
आज माझ्या गावी पाली ,रत्नगिरी येथे माझे मित्र श्री अमोल गुरव यांच्या हॉटेल मध्ये रस्सा वडा खाण्याचा आणि कोकम सरबत पिण्याचा योग जुळून आला.. अतिशय अप्रतिम चव असते.. सर्वांनी कधीतरी नाश्त्याचा आस्वाद घ्यावा असे ठिकाण आहे. नक्की भेट द्या.सोबत स्वतः अमोल. pic.twitter.com/BzpI1bUicZ
— Uday Samant (@samant_uday) September 27, 2021
रत्नागिरीचे आमदार आणि सिंधुदूर्ग पालकमंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेचे नेते अशी ओळख असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे आपल्या साध्या राहणीमान आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेवून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने ते “माझा उदय” म्हणूनच समाजात वावरतात.त्यांच्या या स्वभावाचा आज प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या बालमित्राला आला.समाजकारण किंवा राजकारण करत असताना आजपर्यंत राज्यातील जनतेने अनेक उदाहरणे पाहिली आहेत की जे सामान्य कार्यकर्ते पुढे मोठे नेते झाले आणि आपण सामान्य कार्यकर्ता होतो हे विसरले.परंतु अपवादात्मक काही नेते हे मोठे नेते झाले तरी स्वतः ला अजून सर्वसामान्य कार्यकर्ताच समजतात, मात्र यामध्ये अनेकवेळा उदाहरण देता येईल असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ! आज राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरीही उदय सामंत हे अनेकांचा केवळ “माझा उदय” म्हणूनच समाजात वावरतात.ह्याचा प्रत्यय आज पुन्हा त्यांच्या पाली ( रत्नागिरी) ह्या गावी दिसून आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या दिनक्रमाला आज सुरुवात करताना उदय सामंत ह्यांनी आपले शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवत आपला पाली येथील जुना मित्र अमोल गुरव ह्यांच्या हॉटेल मध्ये आवर्जून थांबत तेथील पूर्वीपासून प्रसिध्द असलेल्या कट-वडा आणि कोकम सरबताचा आस्वाद घेतला. त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत दोन जुन्या मित्रांमध्ये गप्पा देखील रंगल्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री असून देखील उदय सामंत ह्यांचे पाय जमिनीवरच आहेत याचा प्रत्यय पालीवासियांनी आज पुन्हा एकदा आला.