उद्धव ठाकरेंना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही : फडणवीसांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत,प्रत्येक मंत्री स्वत: ला मुख्यमंत्री समजत आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारमधील कोणीही राज्याचा,समस्यांचा विचार करीत नाही असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या येथे झालेल्या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला.उद्धव ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत,महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्री हा स्वत:ला मुख्यमंत्री मानत आहे.असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला.या सरकार मधील कोणीही राज्याचा,समस्यांचा विचार करीत नाही.भाजपच्या सरकार मध्ये विकासावर चर्चा व्हायची.आता या सरकार मध्ये गांजा,हर्बंल तंबाखूवर चर्चा होत आहे अशी टीका करतानाच राज्यातील सर्वांत भ्रष्टाचारी सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारची नोंद होईल असा हल्लाही फडणवीस यांनी चढवला.राज्यात केवळ लूटीचे प्रकार सुरू आहे असे सांगतानाच आता या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगतानाच यापुढे रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात संघर्ष करावे लागेल असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

राज्यातील ठाकरे सरकार म्हणजे काय ते द्याचं आहे.या सरकार मध्ये केवळ बदल्यांचा बाजार मांडला गेलायं,आमच्याकडे इनामी आणि बेनामी सुद्धा नाही.लढाई समोरून लढावी लागते. त्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला घाबरच नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.या महाराष्ट्राची अशी अवस्था अशी कधी जाली नव्हती असे सांगतानाच राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल असेही फडणवीस म्हणाले.आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.या सरकारमध्ये शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही.या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे.मात्र सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीर मुगंटीवार यांनी आज चांगला एक चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. त्यांनी या सरकारचे कपडे काढले. पण या निर्लज्जांवर काही फार परिणाम होत नाही,त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरवावेच लागेल. आता कोरोना आहे म्हणून ते आम्हाला थांबवू शकत नाही. दोन वर्ष कोरोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होते. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते आम्हाला रोखू शकत नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Previous article..तर एसटीच्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकू ; प्रविण दरेकर यांचा इशारा
Next articleकाशिफ खान आणि वानखेडेंचे काय संबंध आहेत, काशिफ खान व व्हाईट दुबेला का वाचवत आहे ?