फडणवीस स्वप्नं बघायचं बंद करा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही !

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत,प्रत्येक मंत्री स्वत: ला मुख्यमंत्री समजत आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्या नंतर त्यांच्या या टाकेला अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रतित्युत्तर दिले आहे.देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहेत.फडणवीस उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या येथे झालेल्या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला.उद्धव ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत,महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्री हा स्वत:ला मुख्यमंत्री मानत आहे.असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला.या सरकार मधील कोणीही राज्याचा,समस्यांचा विचार करीत नाही.भाजपच्या सरकार मध्ये विकासावर चर्चा व्हायची.आता या सरकार मध्ये गांजा,हर्बंल तंबाखूवर चर्चा होत आहे अशी टीका करतानाच राज्यातील सर्वांत भ्रष्टाचारी सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारची नोंद होईल असा हल्लाही फडणवीस यांनी चढवला होता.त्यांच्या या टीकेचा समाचार राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून घेतला आहे.फडणवीसांच्या भाषणानंतर मलिक यांनी एक ट्विट केले आहे.त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरेजी यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे.देवेन्द्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही, असे ट्विट करीत मलिक यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

Previous articleराजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा
Next articleभाजपा राज्यभर घेणार २० हजार सभा; रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी