मुंबई नगरी टीम
बीड । राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच ‘लोकनेता’ उपाधी मिळते,अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला.
झाले असे की,पंकजा मुंडे आज सायंकाळी औरंगाबादहून परळीकडे जात होत्या,बीडमध्ये दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्या पार्श्वभूमी कार्यालयात गेल्या होत्या, पंकजा मुंडे बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला,पंकजा मुंडे त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचीच आठवण आली.