महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनामुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती,नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे करण्याची तरतूद आहे.तथापि, जात पडताळणी समित्यांकडील कामाच्या भारामुळे केवळ वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी उपरोक्त सर्व अधिनियमांत यापूर्वीच सुधारणा करुन महानगरपालिका,नगरपरिषदांच्या सार्वत्रिक,पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची १२ महिन्यांची मुदत हमीपत्रावर देणे अशी तरतूद करण्यात आली होती.

Previous articleकोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Next articleअन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टॅालवर…..!