मी ‘रनरच्या’ भूमिकेत कार्यक्रमाला आलेय….सुप्रियाताईंची बॅटिंग

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन आज येथे पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते.मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहत या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करणारे होते.मात्र त्यांना कोरोना झाल्याने प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार यांनी मार्गदर्शन केले.एका आश्रमशाळेच्या कार्यक्रमाला जायंच होतं.पण पवार साहेब हे या कार्यक्रमाला येणार होते.पण त्यांच्या अनुपस्थितीत मला कार्यक्रमाला यावं लागलं.पवार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह धरला. कार्यक्रम महत्वाचा असल्याने मला याव लागलं. एखादा बॅटसमन जखमी होतो.तेव्हा त्याला रनर लागतो,तसेच मी आजच्या कार्यक्रमाला रनरच्या भूमिकेत आले आहे अशी फटकेबाजी खासदार सुळे यांनी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलींच्या लग्नाचे वय २१ असावे का १८ यावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी असे मत मांडले. यामध्ये बरीच मतमतांतरे आहेत परंतु कोणीही फक्त स्वतःचा विचार न करता समाजावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करून मत मांडावे असे आवाहन केले.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी राज्य महिला आयोगाचा इतिहास आणि त्यांनी गेल्या ३ महिन्यात राज्य महिला अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यावर केलेली कामे सर्वांसमोर मांडली.महिलाच महिलांच्या शत्रू असतात हा समाजातील विचार आपण खोडून काढायला हवा. सगळीकडेच ही परिस्थिती नसते. बऱ्याच ठिकाणी महिला महिलांच्या सहकारी असतात असे मत विधानपरिषद उपसभापती, आमदार नीलम गोऱ्हे यांनी मांडले.महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपले मत मांडताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. जी महिला आर्थिक दृष्टया सक्षम असते तिच्यावर अन्याय अत्याचार होण्याचे प्रमाण कमी असते असे विचार मांडले.महिला आर्थिक विकास महामंडळच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी रुपाली चाकणकर जेव्हापासून अध्यक्षा झाल्या आहेत तेंव्हापासून महिला आयोगाचे काम वेगाने वाढले असल्याचे प्रतिपादन केले.

Previous articleदिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले
Next articleकिरीट सोमय्यांना खुर्ची देणारा अधिकारी गोत्यात ! हा तर मोगलाई कारभार,दरेकरांचे टीकास्त्र