किरीट सोमय्यांना खुर्ची देणारा अधिकारी गोत्यात ! हा तर मोगलाई कारभार,दरेकरांचे टीकास्त्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल मंत्रालयात येवून नगरविकास विभागात फाईली चाळल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.यावरून आता भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.अशा प्रकारची कारवाई करणे म्हणजे मोगलाई पद्धतीचा कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मंत्रालयातील नगरविकास विभागात एका केबिनमध्ये फाईल तपासात होते आणि त्यावेळी किरीट सोमय्या यांना बसायला खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तर किरिट सोमैय्या मंत्रालायत एका अधिकाऱयांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ज्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली ती निषेधार्थ आहे.अशा प्रकारची कारवाई करणे म्हणजे मोगलाई पद्धतीचा कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.सरकार कोणाच्या मालकीचे झाले आहे का.तुम्हाला आली लहर आणि तुम्ही त्या अधिका-याला निलंबित करणार का.यापूर्वी कुठला नेता मंत्रालयात जाऊन कुठल्या खुर्चीवर बसला नाही का ? असा सवाल करतानाच सरकारचा हा अतिरेकी कारभार असून आम्ही याचा धिक्कार करतो असे दरेकर यांनी सांगितले.

Previous articleमी ‘रनरच्या’ भूमिकेत कार्यक्रमाला आलेय….सुप्रियाताईंची बॅटिंग
Next articleवडीलांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करणार : संतोष सिंह