…आणि नाराज छत्रपती संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी सह्याद्रीवर बोलावले !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते.त्यांनी संबंधित अधिका-यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील सहावा मजला गाठला.त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संबंधित अधिका-यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे निरोप धाडला.मात्र दीड तास थांबूनही भेट न झाल्याने नाराज झालेले छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे गेले.यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी शिंदे गटातील आमदार,जिल्हा प्रमुख यांच्याशी चर्चा करीत होते.यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत निरोप धाडला.मुख्यमंत्री बोलवतील या आशेवर तब्बल दीड ते दोन तासांचा वेळ निघून गेला.तो पर्यंत छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ताटकळत राहिले होते.मात्र मुख्यमंत्र्यांकडून भेटीसाठी बोलावणे येत नसल्याचे लक्षात येत नसल्याचे समजताच छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.

भेट न मिळाल्याने नाराज झालेले छत्रपती संभाजीराजे यांनी भोजनासाठी हॅाटेलवर आपला मोर्चा वळवला.मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी संपताच संबंधित अधिका-यांनी झालेला प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानी घालताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट छत्रपती संभाजीराजे यांना फोन करून कुठे असल्याचे विचारले.आपली प्रतिक्षा करीत शेवटी जेवणासाठी हॅाटेलवर आल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगताच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटायला तिथे येतो असे सांगितले.आपण मुख्यमंत्री आहात मला भेटायला हॅाटेलवर येणे योग्य नाही.त्याऐवजी मी आपणास भेटण्यासाठी सह्याद्रीवर येतो असे छत्रपती संभाजीराजे यांना सांगितले.त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जावून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.

Previous articleमुख्यमंत्री अधिक गतीने धावत आहेत,दुसरं काही दिसलं नाही : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
Next articleपन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे -फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी !