मुंबई नगरी टीम
मुंबई । घरची गरिबी असल्यामुळे पडेल ते काम करावे लागले.मी १९ वर्षांचा असताना पळून जाऊन लग्न केले. आमदार बाबुराव भापसे यांच्या मुलीला पळवून नेऊन मी विवाह केला.भापसे दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एक वेळा विधानसभेचे सदस्य होते.त्याकाळी आमदाराची मुलगी पळवून न्यायची,ही फार मोठी गोष्ट होती.पण ते धाडस मी केले, तिथूनच धाडस कसे करायचे हे शिकलो”, असे रोखठोक मत मांडतानाच,बालपणीचा संघर्ष,महाविद्यालयीन जीवनातले प्रेम प्रकरण, नंतर गरिबीमुळे केलेली हमाली,पुढे व्यवसायात झालेली भरभराट,राजकारणात एकामागोमाग एक मिळालेली पदे अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात केला.प्रसाद लाड यांच्यासह विधान परिषदेतील १० आमदार निवृत्त झाले.त्यावेळी सभागृहात भावना व्यक्त करताना आ.लाड यांनी केलेल्या भाषणाला सभागृहातील सदस्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,संजय दौंड,प्रसाद लाड,दिवाकर रावते,रविंद्र फाटक,सुभाष देसाई,विनायक मेटे, सुरजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत हे विधान परिषद सदस्य निवृत्त झाले.या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना रोखठोक भूमिका मांडली.बालपणीचा संघर्ष,महाविद्यालयीन जीवनातले प्रेम प्रकरण नंतर गरिबीमुळे केलेली हमाली,पुढे व्यवसायात झालेली भरभराट,राजकारणात एकामागोमाग एक मिळालेली पदे अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात केला.त्यांच्या या भाषणाला सर्वच आमदारांनी टाळ्या वाजवून दाद दिली.लाड म्हणाले,माझं बालपण परळच्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. माझे वडील दिवाकर रावते, सुभाष देसाईंच्या बरोबरीचे शिवसैनिक होते. त्यामुळे राजकारणाचा अंगभूत गुण माझ्यात आला.त्यावेळी घरची गरिबी असल्यामुळे पडेल ते काम करावे लागले.१९ वर्षांचा असताना मी पळून जाऊन लग्न केले.आमदार बाबुराव भापसे यांची मुलीला पळवून नेऊन मी विवाह केला.बाबुराव भापसे दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तर एक वेळा विधानसभा सदस्य होते. त्याकाळी आमदाराची मुलगी पळवून न्यायची, ही फार मोठी गोष्ट होती. पण त्या वेळी ते धाडस मी केले आणि तिथूनच धाडस कसे करायचे हे शिकलो.
माझे सासरे आमदार बाबुराव भापसे यांचा त्यावेळचा रुबाब बघून मी तेव्हाच ठरवले की एकदा तरी आपण आमदार व्हायचे.मग महाविद्यालयीन जीवनात नेतेगिरी करायला लागलो. जयंत पाटील यांच्यामुळे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी सिद्धीविनायक न्यासाच्या विश्वस्तपदी काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मला वेळोवेळी संधी दिली,असे सांगून ही नावं मी आज मुद्दामहून घेणार असे सांगण्यास आ. लाड विसरले नाहीत.या संधी नंतर मुंबई म्हाडाचा सभापती म्हणून नियुक्ती झाली.त्यावेळी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ही संधी राष्ट्रवादी पक्षाने दिली.हे पद मुंबईतल्या राजकारणातले महत्त्वाचे पद मानले जाते.त्यावेळी सभापतीला राज्यमंत्र्यांचा दर्जा आणि लाल दिव्याची गाडी होती. हे सर्व ४० व्या वर्षी मिळाले. एकंदरित मला खूप लवकर काही गोष्टी मिळत गेल्या.आता तर माझ्या मुलीचे लग्न झाल्याने सासराही झालो आहे असेही लाड यांनी सांगितले.
विधान परिषदेचा सदस्य म्हणून मला सहा वर्षे काम करता आले नाही.मला पावणे पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. परंतु ही पाच वर्षे कधी आणि कशी गेली,हे काही कळलं नाही.अडीज वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते,तर गेली अडीज वर्षे विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून काम केले. विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून काम करताना संसदीय आयुधांचा वापर कसा करायचा, हे अधिक बारकाईने शिकलो असे सांगतानाच,म्हणून कायम मला विरोधी पक्षातच काम करायचे आहे, असे नाही,असेही लाड यांनी स्पष्ट केले.